Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा 'हे' पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
पितृपक्षातील श्राद्धाच्या नैवेद्यात तांदळाची खीर, पुरणपोळी, शेवया आवर्जून बनवल्या जातात. तांदूळ, साखर, सुका मेवा टाकून बनवलेली खीर पितरांना अत्यंत प्रिय मानली जाते.
नैवेद्यासाठी काकडीचे किंवा तिखट वडे बनवले जातात. हे वडे कोणत्याही कडधान्याच्या भाजीसोबत खाल्ले जातात.
हिरव्या गार अळूच्या पानांना बेसन आणि मसाले लावून वाफवले जातेय. त्यानंतर तयार केलेल्या अळू वड्या गरम तेलात तळून घेतल्या जातात. याशिवाय काही घरांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांपासून भाजी सुद्धा बनवली जाते.
पितृ पक्षातील नैवेद्याच्या पानावर आवर्जून मिक्स भाजी बनवली जाते. यामध्ये मेथी, गवार किंवा अळू इत्यादी भाज्यांचा समावेश केला जातो. भाज्यांमध्ये कांदा-लसूण पूर्णपणे वर्ज्य असते.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात तांबडा भोपळा, पडवळ किंवा कारली उपलब्ध असतात. या भाज्या नैवेद्याच्या पानात ठेवल्या जातात. भोपळा, पडवळ, कारली खाल्यामुळे शरीराला सुद्धा फायदे होतात.