Railway Ticket Concession: तुम्हाला माहिती आहे का? रेल्वे तिकिटावर काही प्रवाशांना मिळते 75 टक्क्यांची सूट
रेल्वे काही प्रवाशांना खास डिस्काउंट देते, ज्यात विद्यार्थ्यांपासून आजरांनी ग्रस्त झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय दिव्यांगांनाही ट्रेनच्या तिकिटावर विशेष सूट देण्यात येते
तसेच कोणत्याही व्यक्तीच्या मदतीशिवाय प्रवास करू न शकणाऱ्या व्यक्तींना जनरल क्लास,स्लीपर आणि 3 AC मध्ये 75 टक्क्यांची सूट दिली जाते
1AC, 2AC मध्ये प्रवाशांना 50 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येते. तसेच राजधानी शताब्दीसारख्या रेल्वेमध्ये 3AC आणि AC मध्ये 25 टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येते
शिवाय असे व्यक्ती ज्यांना बोलण्यास किंवा ऐकण्यास समस्या निर्माण होतात, जे ऐकण्यास अथवा बोलण्यास असमर्थ आहेत अशांना 50 टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येते
रेल्वेत अनेक आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींना डिस्काउंट दिला जातो. यात कर्करोग, थॅलेसिमीया, हृदयरोग, किडनी. हीमोफीलियाचे रुग्ण, टीबीचे रुग्ण, एड्सचे रुग्ण, ऑस्टोमीचे रुग्ण, एनीमिया, अप्लास्टिक ॲनिमियाच्या रुग्णांचा समावेश आहे
याशिवाय रेल्वे विद्यार्थ्यांनाही तिकिटावर सूट देते. आपल्या गावापासून दूर शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 ते 70 टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येते