Haribhau Bagde from maharashtra as Vice President of india afterJagdeep Dhankhar
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होताच पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला आहे. आरोग्याची चिंता आणि वैद्यकीय सेवेला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे कारण देत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारल्यांतर मराठमोळ्या एका नावाची चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रातील नेते हरिभाऊ बागडे यांची देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी नाव आघाडीवर आहे.
हरिभाऊ बागडे हे वयाच्या 13 व्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये कार्य करत आहेत. बागडे हे मुळचे औरंगाबादचे असून ते नेहमी पांढरा सदरा, धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी अशा पेहरावामध्ये असतात. हरिभाऊ बागडे यांनी पाच वेळा आमदार पद भुषवले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघातून 1990, 1995, 1999 आणि 2014मध्ये ते निवडून आले. 1995 ते 97 दरम्यान ते मंत्री होते आणि 1197 ते 99 दरम्यान अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपददेखील त्यांनी सांभाळले आहे. 2014 ते 2019 दरम्यान त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली.
यानंतर आता हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे विद्यमान राज्यपाल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करुन हरिभाऊ बागडे यांना याबाबत माहिती दिली होती.
आता उपराष्ट्रपतीपदासाठी पुन्हा एकदा हरिभाऊ बागडे यांचे नाव चर्चेत आले आहेत. अगदी गरिबीमधून दिवस काढलेल्या हरिभाऊ बागडे यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर नवीन देशाचे उपराष्ट्रपती कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यामध्ये एक महाराष्ट्रातील मराठमोळे नाव चर्चेत आहे ते म्हणजे हरिभाऊ बागडे. विद्यमान राज्यस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी समाजकार्यासाठी स्वतःला झोकून दिले असून ते पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय मानले जातात.