रतन टाटा यांचे 86 वर्षी निधन झाले. भारतातच काय तर संपूर्ण जगभरात रतन टाटा यांनी आपल्या नावाचा डंका वाजवला. त्यांच्या निधनानंतर सेलिब्रिटीपासून ते नेत्यांपर्यंत सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. त्यांनी अनेक गोष्टी मागे सारुन या जगाचा निरोप घेतला आणि त्यातीलच एक गोष्ट म्हणजे, त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट. रतन टाटा यांचा हा प्रोजेक्ट पूर्ण झाला होता मात्र एका कारणामुळे त्यांना त्याचे उद्घाटन करता आले नाही. हे कोणते कारण आहे ते जाणून घेउयात.
रतन टाटांचा हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण झाला पण उद्घाटन राहूनच गेले... हे कारण ठरतंय कारणीभूत
फार पूर्वीपासून रतन टाटा यांना हा प्रोजेक्ट साकारायचा होता मात्र त्याच्या उद्घाटनाआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. हे उद्घाटन लांबवण्यासाठीचे कारण ठरले निवडणूक...
रतन टाटा यांना प्राण्याविषयी विशेष जिव्हाळा होता. त्यांचे प्राण्यांवर फार पूर्वीपासून खूप प्रेम होते. आपल्या याच प्राणीप्रेमापोटी तन टाटांच्या पुढाकाराने मुंबईतील महालक्ष्मी येथे प्राण्यांचे अद्ययावत रुग्णालय उभारले
रतन टाटांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या या रुग्णालयात काम 80 टक्के पूर्ण झाले असून लोकसभेच्या आचारसंहितेमुळे उद्घाटन न करताच या रुग्णालयातील अनेक सेवा सुरु करण्यात आल्या आहेत
या रुग्णालयामध्ये गायनॉकॉलॉजी विभाग, शल्यशिकित्सा विभाग, त्वचा रोग विभाग, आयसीयू, अपघात विभाग, आप्तकालीन विभाग, सीटीस्कॅन, एमआरआय, रेडिओलॉजी, सोनोग्राफी, डायलिसिस सेंटर, रक्तपेढी असे एकूण 25 विभाग आहेत. येथे भटक्या श्वानांना आणि प्राण्यांना मोफत उपचार दिले जाणार आहेत.
लोकसभेच्या आचारसंहितेमुळे कोणत्याही उद्घाटनाशिवाय हे रुग्णालय सुरु करण्यात आले होते. या रुग्णालयाचे उद्घाटन होण्यापूर्वीच रतन टाटा यांचे निधन झाल्याने आता प्राणीप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे