सकाळी उठल्यानंतर व्यवस्थित पोट स्वच्छ न होण्यास कारणीभूत ठरतात रोजच्या जीवनातील 'या' चुकीच्या सवयी
संपूर्ण दिवस आनंदात जाण्यासाठी सकाळची सुरुवात आनंदाने होणे आवश्यक आहे. बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही. पोट स्वच्छ न झाल्यामुळे काहींना सतत अस्वस्थ वाटू लागते तर काहींना ऍसिडिटी होते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम करतात, ज्यामुळे इतर आजारांची शरीराला लागण होण्याची जास्त शक्यता असते. कायमच तिखट किंवा तेलकट पदार्थांचे रोजच्या आहारात सेवन केल्यामुळे शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. जीवनशैलीतील चुकांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे चुकीच्या सवयी फॉलो न करता योग्य सवयी फॉलो करणे आवश्यक आहे. सकाळी व्यवस्थित पोट स्वच्छ न झाल्यामुळे पचनक्रियेवर तणाव येतो, ज्यामुळे पोट आणि आतड्यांना इजा होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे गॅस, अपचन किंवा आरोग्यासंबंधित इतर आजार होण्याची जास्त शक्यता असते. वारंवार पोट फुगल्यासारखे वाटणे, अजीर्ण होणे किंवा पोटात जडपणा वाढू लागतो. आज आम्ही तुम्हाला रोजच्या जीवनातील कोणत्या सवयींमुळे पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या सवयी कायमच फॉलो केल्यास शरीराला हानी पोहचते. पोटाचे आरोग्य बिघडल्यामुळे शरीराची ऊर्जा काहीशी कमी होऊन जाते. याशिवाय सतत अशक्तपणा किंवा थकवा जाणवू लागतो.
शरीरातील निर्माण झालेली पाण्याची कमतरता संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम करते. यामुळे डिहाड्रेशन, सतत अशक्तपणा किंवा पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे आतड्यांमध्ये विषारी घाण तशीच चिटकून राहते, ज्यामुळे सतत पोटात दुखणे किंवा आतड्यांमध्ये वेदना वाढू लागतात. आतड्यांमधील मल हळूहळू कठीण होऊन जातो, ज्यामुळे पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही. त्यामुळे नियमित भरपूर पाण्याचे सेवन करावे. नियमित ७ ते ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
अनेकांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट सुद्धा चहाने होते. अतिप्रमाणात चहाचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे दिवसभरात कमीत कमी चहाचे सेवन करावे. चहामध्ये कॅफिन असते. ज्यामुळे आतड्यांच्या हालचालींमध्ये बिघाड होतो. त्यामुळे नियमित चहा किंवा कॉफीचे खूप कमी प्रमाणात सेवन करावे.
तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्यासाठी ठरेल वरदान, शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून मिळेल सुटका
शरीरामध्ये फायबरची कमतरता निर्माण झाल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही. पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे आतड्यांमध्ये घाण तशीच चिकटून राहते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या उद्भवते. त्यामुळे कायमच आहारात फायबरयुक्त पदार्थांचे नियमित सेवन करावे. ताजी फळे, भाज्या, सुकामेवा आणि पौष्टीक बियांचे सेवन केल्यास शरीराला फायबर मिळेल.