लघवीला कधी कधी खूपच दुर्गंधी येते आणि याची अनेक कारणं असू शकतात. याबाबत आयुर्वेदिक डॉक्टरांनी माहिती दिली आहे
डिहायड्रेशनमुळेही शरीराला दुर्गंधी येते. शरीरात पाण्याची कमतरता असताना लघवी घट्ट होते, ज्यामुळे दुर्गंधी येते
काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानेही लघवीला वास येऊ शकतो. कांदा, लसूण, ब्रसेल्स स्प्राउट्स आणि कॉफी यांसारख्या पदार्थांमुळे लघवीला घाण वास येऊ शकतो असं सांगण्यात येते
UTI अर्थाय युरिनरी ट्रॅक्ट कारणामुळेही लघवीला दुर्गंध येऊ शकतो. अनेकांना युटीआयची समस्या उद्भवते तेव्हा लघ्वीला दुर्गंध येतो
डायबिटीस, किडनी स्टोन आणि काही आजारांचा त्रास असेल तर लघवीतून दुर्गंधी येण्याची समस्या उद्भवू शकते
लघवीला जास्त दुर्गंधी येत असेल तर नैसर्गिक त्रास आहे असे समजून अजिबात त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांची मदत घ्या