चिमूटभर केशर नियमित खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
केशरमध्ये क्रोसिन आणि क्रोसेटिन नावाचे दोन रसायन आढळून येतात. ज्यामुळे मेंदूच्या कार्यास प्रोत्साहन मिळते आणि मेंदूचे कार्य कायमच सुरळीत राहते. यासाठी केशर पाण्यात किंवा दुधात मिक्स करून खावे.
केशरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस, अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. या घटकांमुळे शरीराला ऊर्जा मिळते.
रात्री झोपण्याआधी नियमित केशर दूध प्यायल्यास महिनाभरात त्वचेमध्ये अनेक बदल दिसून येतील. याशिवाय त्वचा अतिशय चमकदार आणि ग्लोइंग दिसेल.
मासिक पाळीच्या दिवसांमधील थकवा, अशक्तपणा, चिडचिडेपणा, झोपेच्या समस्या, ओटीपोटात दुखणे, डोकेदुखी आणि मॅक्युलर त्वचा इत्यादी समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केशर दूध प्यावे.
केशर चहामध्ये सॅफ्रानल अँटीऑक्सिडेंट आढळून येतात, ज्यामुळे शरीरात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीवायरल क्रियाकलाप वाढू लागतात. त्यामुळे नियमित केशर खावे.