Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हार्ट अटॅकच्या धोक्याला कमी करतात ‘हे’ सुपरफूड, नॅचरली वाढवतात गुड कोलेस्ट्रॉल

Healthy Food Tips : झपाट्याने वाढत चाललेल्या आजारांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचा प्रामुख्याने समावेश होतो. अधिकतर लोकांचा जीव या आजाराने घेतला असून काही पदार्थांचे सेवन तुम्हाला या आजरापासून सुरक्षित ठेवू शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 28, 2026 | 11:00 AM
हार्ट अटॅकच्या धोक्याला कमी करतात 'हे' सुपरफूड, नॅचरली वाढवतात गुड कोलेस्ट्रॉल

हार्ट अटॅकच्या धोक्याला कमी करतात 'हे' सुपरफूड, नॅचरली वाढवतात गुड कोलेस्ट्रॉल

Follow Us
Close
Follow Us:
  • हार्ट अटॅकचा धोका झपाट्याने वाढत आहे.
  • हा आजार आपला जीवही घेऊ शकतो.
  • आपल्या आहाराचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो.
मागील काही काळापासून आरोग्याच्या समस्या फार सामान्य झाल्या आहेत. पूर्वी क्वचित लोकांना जाणावणारे आजार आजकाल दर दहापैकी एका माणसांत आढळून येतात. यात प्रकर्षाने समावेश होतो हृदयविकाराच्या झटक्याचा. पूर्वी वृद्धत्वात लोक जगाचा निरोप घ्यायची पण आजकाल हृदयविकाराच्या झटक्यानेच लोक कमी वयात जगाला सोडून जात आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपली बदलेली जीवनशैली आणि चुकीचा आहार.

हृदयविकाराच्या झटका एक असा आजार आहे ज्यात अचानक आपल्या शरीरातील हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा खंडित होतो. यामुळे छातीत तीव्र वेदना होऊ लागतात, घाम येतो आणि बऱ्याचदा शरीराच्या इतर भागांत कळा जाणवू लागतात. हा आजार धोकादायक असून यात जागीच जीव जाण्याचा धोका असतो. तुम्हालाही या धोकादायक आजारापासून जर स्वतःचे संरक्षण करायचे असेल तर आजपासूनच आपल्या आहारात काही हेल्थी आणि आरोग्याला फायदेशीर ठरणाऱ्या समावेश करायला सुरुवात करा.

हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्टेरॉलची पातळी फार महत्त्वाची असते, विशेषतः चांगल्या कोलेस्टेरॉलची (HDL) उच्च पातळी आणि वाईट कोलेस्टेरॉलची (LDL) कमी पातळी. सांगण्यात येते की, सामान्यतः पुरुषांचे एचडीएल हे नेहमी चाळीशीच्या वर असायला हवे तर महिलांचे एचडीएल पन्नाशीच्या वर असायला हवे.

वाढत्या वजनाची चिंता सोडा! डायट-वर्कआउट करून घाम गाळायची गरज नाही, झोपेतच बर्न होईल फॅट; आजपासूनच करा हे बदल

शरीरात आवश्यक असणारे फॅट्स

मोनोसॅच्युरेटेड फॅट्स

हे वनस्पती-आधारित अन्नांमधून मिळू शकतात. हे शरीरातील खराब कोलेस्ट्राॅल कमी करुन हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स

हे हृदय, मेंदू आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे हेल्थी फॅट आहे. सूर्यफुलाच्या बिया, अळशी, सॅल्मन, बांगडा, अक्रोड, बदाम यापासून हे फॅट तुमच्या शरीराला मिळू शकेल.

ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स

ते एचडीएल वाढवते आणि ट्रायग्लिसराइड्स देखील कमी करते, जे हृदयासाठी आणखी एक धोका मानले जाते. हे मासिक पाळीत वेदना कमी करण्यास मदत करते.

तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

फॅटी फिश

ओमेगा-३ फॅटी ॲसिडने समृद्ध माशांचे सेवन आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळवून देऊ शकते. यात सॅल्मन, हिल्सा, बांगडा आणि अँकोव्हीज अशा माशांचा समावेश होतो. आठवड्यातून दोनदा तुम्ही त्यांचे सेवन करु शकता.

जवसाच्या बिया

जवसाच्या बियांमध्ये ओमेगा-३ आणि विरघळणारे फायबर्स भरपूर प्रमाणात असतात जे शरीरातील खराब कोलेस्ट्राॅलची पातळी कमी करण्यास मदत करतात. यामुळे रक्तातील एचडीएल आणि एलडीएलचे निरोगी संतुलन राखण्यास मदत होते.

नट्स

हेल्दी फॅटचा चांगला स्त्रोत मानल्या जाणाऱ्या नट्समुळे शरीरात एचडीएलची पातळी थेट वाढत नाही. मात्र ते एचडीएलचे कार्य सुधारण्यास मदत करते. नट्सचे सेवन यकृतातील वाईट कोलेस्ट्रॉल प्रभावीरित्या काढून टाकते, ज्यामुळे कोलेस्ट्राॅलची पातळी कमी होते. अक्रोड, बदाम, पिस्ता अशा नट्सचा तुम्ही आहारात समावेश करु शकता.

एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल

एचडीएल पातळी वाढवण्यास आणि एलडीएल पातळी कमी करण्यास एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलची फार मदत होते. तुम्ही स्वयंपाकघरात जर याचा वापर करत नसाल तर किमान सॅलड ड्रेसिंगसाठी याचा वापर करा.

पॅरीस, मालदीव नाही तर हनिमूनसाठी हे डेस्टिनेशन्स ठरतायंत खास, निसर्गाच्या सानिध्यात घेता येतो रोमँटिक वातावरणाचा अनुभव

फळांचे सेवन करा

शरीरात चांगल्या कोलेस्ट्राॅलची पातळी वाढवायची असेल तर आहारात रंगीबेरंगी फळांचे सेवन करा. सफरचंद आणि बेरी सारखी फायबरयुक्त फळे शरीराला अनेक फायदे मिळवून देतात. सर्व रंगांची शिमला मिरची, गोड बटाटे आणि द्राक्षे देखील एचडीएल वाढवण्यासाठी उपयुक्त मानली जातात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These superfoods reduce the risk of heart attack and naturally increase good cholesterol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • healthy food
  • heart attack
  • lifestyle news

संबंधित बातम्या

वाढत्या वजनाची चिंता सोडा! डायट-वर्कआउट करून घाम गाळायची गरज नाही, झोपेतच बर्न होईल फॅट; आजपासूनच करा हे बदल
1

वाढत्या वजनाची चिंता सोडा! डायट-वर्कआउट करून घाम गाळायची गरज नाही, झोपेतच बर्न होईल फॅट; आजपासूनच करा हे बदल

जेवल्यावर लगेच धावताय शौचालयात, वेळीच व्हा सावध! डॉक्टरांनी सांगितले कारण, बसेल धक्का
2

जेवल्यावर लगेच धावताय शौचालयात, वेळीच व्हा सावध! डॉक्टरांनी सांगितले कारण, बसेल धक्का

ऑल टाइम फेव्हरेट ‘चिकनकारी’! उन्हाळ्यात स्टायलिश आणि कम्फर्टेबल लूकसाठी अशी स्टाईल करा
3

ऑल टाइम फेव्हरेट ‘चिकनकारी’! उन्हाळ्यात स्टायलिश आणि कम्फर्टेबल लूकसाठी अशी स्टाईल करा

रिवॉर्ड पॉइंट्स ते कॅशबॅक… क्रेडिट कार्ड ठरू शकतं नफ्याचा सौदा; जाणून घ्या स्मार्ट वापराच्या टिप्स
4

रिवॉर्ड पॉइंट्स ते कॅशबॅक… क्रेडिट कार्ड ठरू शकतं नफ्याचा सौदा; जाणून घ्या स्मार्ट वापराच्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.