सागरिका नेहमीच साड्यांमध्ये सुंदर दिसते. तिचा कोणताही लुक हा क्लासी आणि स्टायलिश असतो. मात्र साड्यांमधील लुक अधिक मनमोहक असतात. जाणून घ्या तिच्या क्लासी साड्यांबाबत
सागरिकाने तिचा साडी ब्रँड आकुतीमधील ही साडी निवडली असून हँडप्रिंटेड डिझाईन त्यावर करण्यात आले आहे आणि तिने यासह मोत्यांचे दागिने घालत रॉयल लुक पूर्ण केलाय. एखाद्या कार्यक्रमासाठी तुम्ही हा लुक करू शकता
साधी आणि तरीही मनाला भावेल अशी फॅशन कशी करायची हे तुम्ही सागरिकाच्या स्टाईलवरून शिकू शकता. सॅटिनची बॉर्डर प्रिंटेड साडी सागरिकाने नेसली असून त्यासह अत्यंत मिनिमल दागिने आणि मेकअप करत लुक केलाय
सागरिकाचा हा सिल्क साडीमधील रॉयल लुक कमाल आहे. बरेचदा राजघराण्यातील स्त्रियांसारखा खांद्यावर पदर घेताना सागरिका दिसून येते आणि तिची ही स्टाईल अनेकांना भावते
सागरिकाची ही गोल्डन टिश्यू सिल्क साडी कोणत्याही क्लासी समारंभासाठी नक्कीच योग्य आहे. यासह सागरिकाने मिनिमल ग्लॅम मेकअप आणि रॉयल दागिने घालत लुक पूर्ण केलाय
पिवळ्या बनारसीमध्ये सागरिकाचे मनमोहक सौंदर्य कोणाला भावणार नाही? या साडीत सागरिका एखाद्या राणीसारखी दिसत असून कोणत्याही सणासाठी तुम्ही सागरिकासारखा लुक नक्कीच करू शकता
सागरिकाने नेसलेली ही डिझाईनर साडी तुम्ही घरातील कोणत्याही कार्यक्रमासाठी अथवा पार्टीसाठीही स्टाईल करू शकता. अत्यंत माफक दागिने आणि मेकअपमध्येही सौंदर्य जपता येतं हे सागरिका तिच्या प्रत्येक लुकमध्ये दाखवून देते