संस्कृती बालगुडेने अगदीच वेगळी स्टाईल केली असून तिचा हा लुक कमालीचा व्हायरल होतोच आहे. पण त्यावर चर्चाही होऊ लागली आहे
कपड्यांच्या टॉपऐवजी पांढऱ्या गुलांबांचा बुके संस्कृतीने टॉप म्हणून घातला आहे आणि अनेक अभिनेत्रींच्या फॅशनला टक्कर दिल्याचे दिसतेय
संस्कृतीने याखाली लाईट ब्लू ट्राऊझर घातली असून तिचा हा लुक पूर्ण केलाय. अत्यंत आत्मविश्वासाने तिने ही स्टाईल कॅरी केली आहे
तिच्या केसांची तिने कर्ल लुक देत हेअरस्टाईल केली असून त्यातील ब्राऊन हायलाईट्स अधिक उठावदार दिसून येत आहेत
संस्कृतीचा हा लुक नक्कीच चर्चा करण्यासारखा असून अनेक सेलिब्रिटींनीही तिला यावर कमेंट्स दिल्या आहेत
ग्लॅमरस मेकअपचा आधार संस्कृती बालगुडेने घेतला असून चेहऱ्यावर अधिक हायलायटर, ग्लॉसी मेकअप केलाय