सारा अली खानने शेअर केले केदारनाथ भेटीचे फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री सारा अली खानने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक छानशी पोस्ट शेअर केली आहे. ती केदारनाथच्या दर्शनाला गेली आहे.
सारा अली खानच्या हस्ते केदारनाथमध्ये पूजा पार पडली. मनो भावे पूजा करत सारा अली खानने केदारनाथ व परिसरातील निसर्गाचा आनंद घेतला.
गळ्यात वृद्राक्षाची माळ, कपाळी हळद कुंकू लावून, सारा अली खान पूजेतील मंत्रोपचारत मंत्रमुग्ध झालेली दिसून येत आहे. त्यासह तेथील निसर्गाचे फोटोज् साराने तिच्या चाहत्यांना शेअर केले आहे.
सारा अली खानने पोस्टखाली कॅप्शन दिले आहे की,"जय श्री केदार, मंदाकिनीचा प्रवाह, आरतीचा गजर, ढगांच्या पलीकडे." या शब्दात तिने तेथील भक्तिमय वातावरणाचे वर्णन केले आहे.
पोस्टखाली कॉमेंट्समध्ये सारा अली खानच्या चाहत्यांनी तसेच शिवभक्तांनी महादेवाच्या नावाचे नामस्मरण केले आहे. हर हर महादेव नामाचा गजर केला आहे.