साडीचा लुक होईल अधिक क्लासी आणि रिच, वापरा लेटेस्ट डिझाईन 'पोटली बॅग्ज
सिल्क किंवा पैठणी साडी नेसल्यानंतर त्यावर तुम्ही या डिझाईनची पोटली बॅग वापरू शकता. विविध लेस आणि बनारसी कापडाचा वापर करून बनवलेली बॅग पारंपरिक लुकवर सुंदर दिसते.
तुमच्या साडीच्या रंगानुसार तुम्ही पोटली बॅगची निवड करू शकता. काळा, चांदी, सोनेरी, गुलाबी अशा प्रत्येक रंगात पोटली बॅग सहज उपलब्ध होतात. याशिवाय यामध्ये अनेक वेगवेगळे पर्याय आहेत.
सणावाराच्या दिवसांमध्ये सिल्क, कॉटन, डेनिम, सॅटिन इत्यादी फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेली पोटली बॅग तुम्ही खरेदी करू शकता. फॅब्रिकनुसार पोटलीच्या डिझाइन आणि नक्षी कामात अनेक बदल दिसून येतात.
तुम्हाला जर बारीक नक्षीकाम करून तयार केलेली पोटली बॅग अतिशय सुंदर दिसते. या डिझाईनची बॅग तुम्ही कोणत्याही साडीवर आणि ड्रेसवर घालू शकता.
हल्ली भेटवस्तू म्हणून सुद्धा तुम्ही पोटली बॅग गिफ्ट करू शकता. कारण हल्लीच्या सर्वच मुलींना आणि महिलांना पोटली बॅग वापरायला खूप जास्त आवडते.