Shravan 2025 : शिवलिंगावर ही फळे कधीही अर्पण करू नयेत... भोलेनाथचा प्रकोप होऊ शकतो
श्रावणात भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगाची आवर्जून पूजा केली जाते. यात शिवाला अनेक फळे अर्पण केली जातात. मात्र काही फळे अशी आहेत जी शिवाला क्रोधीत करू शकतात
नारळ हा समुद्रमंथनाच्या प्रक्रियेतून उत्पन्न झाला होता. नारळ आता देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे नारळ भगवान शिवाला अर्पण करणं म्हणजे देवी लक्ष्मीला अर्पित केल्यासारखे आहे जे शाश्त्रानुसार अनुचित आहे
पुराणांमध्ये असे नमूद आहे की केळीचे झाड भगवान शिवाच्या भयंकर रूपामुळे आणि ब्राह्मणाच्या शापामुळे उद्भवले. याच कारणामुळे भगवान शिवाला केळी अर्पण केली जात नाहीत
शिवलिंगावर संपूर्ण डाळिंब अर्पण करण्यास मनाई आहे. तथापि, श्रद्धापूर्वक डाळिंबाच्या रसाचा अभिषेक करणे मान्य केले जाते
धार्मिक दृष्टिकोनातून, जांभळा पूर्णपणे शुद्ध मानला जात नाही. म्हणूनच तो शिवलिंगावर किंवा शिवमूर्तीवर कधीही अर्पण केला जात नाही किंवा प्रसाद म्हणूनही अर्पण केला जात नाही