मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि 'कॉमेडी क्वीन' म्हणून ओळखली जाणारी श्रेया बुगडे (Shreya Bugde) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश फॅशन सेन्सचीही नेहमी चर्चा होते. यावेळी श्रेयाने डेनिम शर्ट आणि जीन्समधील हटके फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे. 'Chic Is My Default' असे कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले असून, तिच्या या स्टायलिश लूकवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
श्रेयाने डेनिम लूकमध्ये केलं हटके फोटोशूट (फोटो सौजन्य: श्रेया बुगडे/ इन्स्टाग्राम)

डेनिम शर्ट आणि जीन्समध्ये श्रेया बुगडेचा स्टायलिश अंदाज.

फोटोंना 'Chic Is My Default' हे कॅप्शन देऊन श्रेयाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मिनिमल मेकअप आणि खुल्या केसांमुळे तिचा लूक अधिक खुलून दिसत आहे.

मोठे हूप इअररिंग्स आणि डेनिम-ऑन-डेनिम स्टाइलमुळे श्रेयाचा हा लूक अधिकच आकर्षक दिसत आहे.

साधेपणा आणि स्टाइलचा सुंदर मिलाफ असलेला श्रेया बुगडेचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.






