बहुप्रतिक्षित ‘श्यामची आई’ चित्रपटाचा टिजर प्रदर्शित…’या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस!
राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' या चित्रपटाचा टिजर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. चित्रपट १० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे. ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे