रंग केल्यामुळे केसांवर होणारे दुष्परिणाम
काही महिला केसांना ऑरेंज, निळा, पिवळा इत्यादी वेगवेगळे रंग करतात. मात्र यामुळे अलर्जी होण्याची शक्यता असते. केसांना केमिकल रंग केल्यामुळे केसांची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते.
केसांना रंग करताना त्याचा वाफ मेंदूमधून डोळ्यांमध्ये, नाकात, तोंडात जाण्याची शक्यता असते. हे रंग शरीराच्या अवयवांमध्ये गेल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.
पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी शक्यतो नैसर्गिक रंगाचा वापर करावा. जेणेकरून तुमचे केस खराब होणार नाहीत. केमिकल रंग केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केसांमध्ये खाज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात.
केसांना रंग करताना त्याचा वाफ नाकात आणि तोंडांमध्ये जातो. यामुळे सर्दी, खोकला होण्याची शक्यता असते. त्यामुळे रंग करताना आरोग्याची योग्य ती काळजी घेऊनच केसांना रंग करावा.
केसांमधील केमिकलयुक्त प्रॉडक्ट डोळ्यांमध्ये उतरल्यास अंधत्व येण्याची शक्यता असते. तसेच पर्मनंट रंग केल्यामुळे केस खराब होऊन जातात.