रात्री उशिरा जेवल्यामुळे उद्भवतात आरोग्यसंबंधित समस्या
रात्रीच्या वेळी उशिरा जेवल्यामुळे आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. या रात्री उशिरा जेवल्यामुळे शरीरातील ऊर्जा हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. तसेच रात्री उशिरा जेवलेल्या जेवणातून शरीराला जास्त कॅलरीज मिळतात.
रात्री उशिरा झोपल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते.शरीरामध्ये कोलेस्टेरॉलच्या स्वरूपात अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होते. तसेच रक्तदाबाचा त्रास होतो.
शरीराची नैसर्गिक सर्काडियन बिघडल्यामुळे झोप न लागणे किंवा झोपेसंबंधित समस्या निर्माण होतात. शरीर शांत ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी झोप घेणे आवश्यक आहे.
शरीरामध्ये वाढलेल्या अतिरिक्त कॅलरीजमुळे शरीरात ऊर्जा वाढण्याऐवजी शरीरामध्ये चरबी जमा होण्यास सुरुवात होते.शरीरामध्ये वाढलेली अतिरिक्त चरबी आरोग्यासाठी धोकादायक आहे.
रात्रीच्या वेळी उशिरा जेवल्यामुळे पचनक्रिया बिघडते. पचनक्रिया बिघडल्यानंतर डोकं दुखणे, पोटात दुखणे, ॲसिडिटी आणि गॅस होण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री लवकर जेवण्याचा प्रयत्न करावा.