Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांच्या आरोग्याचा कोंडमारा! नवीन वर्षाच्या सुरुवातीला पडलेल्या पाऊसामुळे अनेकांना श्वसनविकारांचा त्रास

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत पडलेल्या अवकाळी पावसामुळे शरीरसंबंधित अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे शवसनाचे आजार, सर्दी खोकला इत्यादी समस्या वाढू लागल्या आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 05, 2026 | 11:05 AM
मुंबईकरांच्या आरोग्याचा कोंडमारा! नवीन वर्षाच्या सुरुवातीला पडलेल्या पाऊसामुळे अनेकांना श्वसनविकारांचा त्रास

मुंबईकरांच्या आरोग्याचा कोंडमारा! नवीन वर्षाच्या सुरुवातीला पडलेल्या पाऊसामुळे अनेकांना श्वसनविकारांचा त्रास

Follow Us
Close
Follow Us:

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटे मुंबईत झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला असला, तरी त्याचवेळी ढगाळ हवामान, वाढते प्रदूषण आणि कायम असलेली थंडी यांचा एकत्रित परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः श्वसनविकार, संसर्गजन्य आजार आणि मानसिक आरोग्याशी संबंधित तक्रारी वाढण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.(फोटो सौजन्य – istock)

खराब कोलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांमुळे जीवन येईल धोक्यात, हृदयाच्या आरोग्याचे होईल गंभीर नुकसान

ढगाळ वातावरणामुळे प्रदूषण खाली बसून राहत असून, पावसामुळे खाली आलेले पीएम२.५ आणि पीएम१० कण हवेतच अडकून राहतात. त्यामुळे दमा, ब्राँकायटिस, सायनस यांसारख्या श्वसनविकारांचा त्रास वाढतो. आधीच प्रदूषित हवेमुळे त्रस्त असलेल्या मुंबईत हा धोका अधिक गंभीर ठरत आहे. यासोबतच दमट वातावरणात जीवाणू आणि विषाणूंची वाढ वेगाने होत असल्याने खोकला, घसादुखी, सर्दी-ताप यांसारख्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढू शकते. पावसामुळे साचलेले पाणी हे डासांचे पैदास केंद्र ठरू शकते. परिणामी, डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांचा धोका नाकारता येत नाही.

मानसिक आरोग्यावरही परिणाम:

मानसिक आरोग्यावरही या हवामान बदलाचा परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. सततचे ढगाळ वातावरण आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे शरीरातील ‘सेरोटोनिन ‘ची पातळी घटते, यामुळे नैराश्य, चिडचिड, आळस जाणवण्याचे प्रकार वाढू शकतात, तसेच थंडी आणि आर्द्रतेमुळे सांधेदुखी, संधिवात असलेल्या रुग्णांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. सूर्यप्रकाश कमी मिळाल्याने व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेचाही धोका संभवतो.

सध्या मुंबईत पाऊस, थंडी आणि प्रदूषण हे तिन्ही घटक एकत्र आल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. नागरिकांनी उकळलेले कोमट पाणी प्यावे, बाहेर जाताना मास्कचा वापर करावा. घराभोवती पाणी साचू देऊ नये आणि गरम, ताजा आहार घ्यावा.

छातीत साचून राहिलेला कफ होईल मोकळा! नियमित चघळून खा ‘हा’ आयुर्वेदिक पदार्थ, कायमचा मिळेल आराम

ओलावा आणि घाम यामुळे बुरशीजन्य त्वचारोग:

त्वचारोगांच्याही तक्रारी वाढू शकतात. ओलावा आणि घाम यामुळे पावसाळी वातावरणात बुरशीजन्य त्वचारोग जसे की रिंगवर्म, अॅचलीट फूट यांचे प्रमाण वाढताना दिसते. नववर्षाच्या सुरुवातीलाच बदलत्या हवामानामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून मुंबईकरांनी काळजी न घेतल्यास हा तिहेरी मारा अधिक गंभीर ठरू शकतो, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai residents are facing a health crisis the rain that fell at the beginning of the new year has caused many to suffer from respiratory problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • Winter Care

संबंधित बातम्या

आंबवलेल्या पदार्थांचा आहारात करा समावेश! आतड्यांच्या आरोग्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत आरोग्याला होतील भरमसाट फायदे
1

आंबवलेल्या पदार्थांचा आहारात करा समावेश! आतड्यांच्या आरोग्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत आरोग्याला होतील भरमसाट फायदे

शिड्या चढल्यानंतर लगेच थकल्यासारखे वाटते? आरोग्यासंबंधित उद्भवू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या सविस्तर
2

शिड्या चढल्यानंतर लगेच थकल्यासारखे वाटते? आरोग्यासंबंधित उद्भवू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या सविस्तर

वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरातील कमी झालेले कोलेजनची पातळी भरून काढण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ
3

वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरातील कमी झालेले कोलेजनची पातळी भरून काढण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ

छातीत साचून राहिलेला कफ होईल मोकळा! नियमित चघळून खा ‘हा’ आयुर्वेदिक पदार्थ, कायमचा मिळेल आराम
4

छातीत साचून राहिलेला कफ होईल मोकळा! नियमित चघळून खा ‘हा’ आयुर्वेदिक पदार्थ, कायमचा मिळेल आराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.