‘डान्स महाराष्ट्र डान्स’मध्ये सोनाली, गश्मिर आणि संदीपची धमाल
‘डान्स महाराष्ट्र डान्स’ (Dance Maharashtra Dance) हा नवा शो लवकरच झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर २७ जुलैपासून सुरू होत आहे या शोचं परीक्षण अभिनेता गश्मिर महाजनी (Gashmir Mahajani) आणि सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) करणार आहेत. तर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत संदीप पाठक (Sandip Pathak) असणार आहेत. या नव्या शोच्या निमित्ताने नुकतीच सोनाली कुलकर्णी, गश्मिर महाजनी आणि संदीप पाठकने नवराष्ट्रच्या न्यूज रुममध्ये उपस्थिती लावली आणि याशोबाबत दिलखुलास गप्पा मारल्या.