Sonam Kapoor Photos
अभिनेत्री सोनम कपूर जरीही बॉलिवूडपासून दूर असली तरीही ती कायमच सोशल मीडियावर सक्रिय राहते. तिची नवीन फॅशन सध्या सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने डिझायनर ड्रेस परिधान करून खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.
अभिनेत्री सोनम कपूरने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या सोनम कपूरचे इन्स्टाग्रामवर मल्टीकलर ड्रेसवरील फोटोज् व्हायरल होत आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने बारीक नक्षी काम असलेले आणि डिझायनिंग टॉप त्यावर मॅचिंग ग्रीन कलरचा पायजमा अभिनेत्रीने वेअर केले.
सिंपल हेअरस्टाईल, ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि रेड लिपस्टिक असा लूक करत सर्वांचेच लक्ष वेधले. अभिनेत्रीने या सुंदर लूकमध्ये एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस दिल्या आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत. शिवाय अभिनेत्रीच्या लूकचे ही मोठ्या प्रमाणावर नेटकरी कौतुक करीत आहेत.
सोनम कपूरच्या ह्या व्हायरल होणाऱ्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.