Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharani 5: ‘महाराणी’ पुन्हा येतेय! राणी भारती घेणार वैयक्तिक हिशेबांचा बदला; २०२७ मध्ये नवा सीझन

Maharani 5: हुमा कुरेशीची लोकप्रिय मालिका ‘महाराणी ५’चा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला आहे. राणी भारतीच्या आयुष्यात नवे ट्विस्ट पाहायला मिळणार असून, ही मालिका फेब्रुवारी २०२७ मध्ये Sony LIV वर प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 11, 2026 | 04:15 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Maharani 5: अभिनेत्री हुमा कुरेशी पुन्हा एकदा तिच्या लोकप्रिय राजकीय ड्रामा सिरीज  ‘महाराणी’च्या नव्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘महाराणी’च्या पाचव्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर निर्मात्यांनी बुधवारी या सीझनचा पहिला प्रोमो प्रदर्शित केला आहे. यावेळी राणी भारतीच्या आयुष्यात राजकारणासोबतच वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक नवे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, यंदाची तिची लढाई पूर्वीपेक्षा अधिक वैयक्तिक असणार असल्याचा संकेत प्रोमोमधून मिळत आहे.

राणी भारतीचा नवा अंदाज; प्रोमो चर्चेत

‘महाराणी ५’चा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करत निर्मात्यांनी खास कॅप्शन लिहिलं आहे. ‘काही कर्जे वेळेवर फेडली जात नाहीत, तर त्यांचा हिशेब चुकता केला जातो. राणी भारती परत आली आहे आणि यावेळी हा हिशेब वैयक्तिक आहे,’ अशा आशयाचं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. या छोट्याशा प्रोमोमुळे नव्या सीझनबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

पाचव्या सीझनमध्ये राणी भारतीसमोर अनेक नवी आव्हानं उभी राहणार आहेत. कथेत अनपेक्षित ट्विस्ट आणि मोठे बदल पाहायला मिळतील, असे संकेतही प्रोमोमधून देण्यात आले आहेत.

सामान्य महिलेकडून शक्तिशाली राजकीय व्यक्तिमत्त्वापर्यंतचा प्रवास

गेल्या चार सीझनमध्ये प्रेक्षकांनी राणी भारतीचा सामान्य महिलेकडून बिहारमधील शक्तिशाली राजकीय व्यक्तिमत्त्वापर्यंतचा प्रवास पाहिला आहे. सत्तेसाठीचा संघर्ष, राजकीय कारस्थानं आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा यांमधून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आता पाचव्या सीझनमध्ये तिच्या आयुष्यात कोणती नवी वळणं येणार आणि ती त्यांचा सामना कसा करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हुमा कुरेशीची लोकप्रिय मालिका ‘महाराणी ५’चा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला आहे. राणी भारतीच्या आयुष्यात नवे ट्विस्ट पाहायला मिळणार असून, ही मालिका फेब्रुवारी २०२७ मध्ये Sony LIV वर प्रदर्शित होणार आहे.

Bigg Boss 20: ‘त्याला मी ठार मारेन..’, जय भानुशालीचं नाव घेताच माही विजचा चढला पारा, लव गिलला दिला थेट इशारा; नेमकं काय घडलं?

हुमा कुरेशीही नव्या सीझनसाठी उत्सुक

मालिकेत राणी भारतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री हुमा कुरेशीही पाचव्या सीझनसाठी उत्सुक आहे. यावेळी कथा प्रेक्षकांना अनेक प्रकारे आश्चर्यचकित करेल, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे. हुमा म्हणाली, “मला खरंच वाटतं की सीझन ५ प्रेक्षकांना अनेक प्रकारे आश्चर्यचकित करेल. ‘महाराणी’चा प्रत्येक सीझन एक अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आला आहे, पण हा सीझन विशेष आहे.”

पुढे ती म्हणाली की, या सीझनची कथा दमदार असणार आहे. अनेक अनपेक्षित ट्विस्ट आणि बदल प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच कथेशी जोडून ठेवतील. यावेळी राणीच्या आयुष्याला आणखी एक रंजक वळण मिळणार असून, प्रेक्षक या प्रवासाला कसा प्रतिसाद देतात, हे पाहण्यासाठी ती उत्सुक आहे.

कधी आणि कुठे पाहता येणार ‘महाराणी ५’?

‘महाराणी सीझन ५’ फेब्रुवारी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका ओटीटी प्लॅटफॉर्म Sony LIV वर प्रदर्शित होईल. त्यामुळे राणी भारतीचा नवा प्रवास पाहण्यासाठी चाहत्यांना आता फेब्रुवारी २०२७ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Salman Khan Maatrubhumi Trailer: सलमान खानच्या ‘मातृभूमी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; देशभक्ती आणि युद्धाची भावनिक कहाणी

Web Title: Maharani 5 huma qureshi rani bharti ott release date ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • entertainment
  • OTT

संबंधित बातम्या

Siddharth Chandekar Mitali Mayekar Diwali Party: सिद्धार्थ-मितालीच्या नव्या घरी दिवाळी पार्टीचा जल्लोष; मराठी कलाकारांची मांदियाळी
1

Siddharth Chandekar Mitali Mayekar Diwali Party: सिद्धार्थ-मितालीच्या नव्या घरी दिवाळी पार्टीचा जल्लोष; मराठी कलाकारांची मांदियाळी

Hanuman Ansh OTT: सिनेमागृहांनंतर आता ओटीटीवर धुमाकूळ घालणार ‘हनुमान अंश’; कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट?
2

Hanuman Ansh OTT: सिनेमागृहांनंतर आता ओटीटीवर धुमाकूळ घालणार ‘हनुमान अंश’; कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट?

Salman Khan Maatrubhumi Trailer: सलमान खानच्या ‘मातृभूमी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; देशभक्ती आणि युद्धाची भावनिक कहाणी
3

Salman Khan Maatrubhumi Trailer: सलमान खानच्या ‘मातृभूमी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; देशभक्ती आणि युद्धाची भावनिक कहाणी

Bigg Boss 20: ‘त्याला मी ठार मारेन..’, जय भानुशालीचं नाव घेताच माही विजचा चढला पारा, लव गिलला दिला थेट इशारा; नेमकं काय घडलं?
4

Bigg Boss 20: ‘त्याला मी ठार मारेन..’, जय भानुशालीचं नाव घेताच माही विजचा चढला पारा, लव गिलला दिला थेट इशारा; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.