नक्षीदार पैठणी साडीवर शिवा 'या' पॅटर्नचे सुंदर ब्लाऊज
कोणत्याही रंगाच्या पैठणी साडीवर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शिवून घेऊ शकता. लाल किंवा गुलाबी रंगाच्या नक्षीदार पैठणी साडीवर हिरव्या रंगाचा ब्लाऊज अतिशय सुंदर दिसेल.
बाजारामध्ये पैठणी साडीचा काठ असलेले ब्लाऊज पीस उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही पैठणी साडीवर पैठणी पॅटर्नचा ब्लाऊज शिवू शकता.
काहींना हेवी वर्क केलेले ब्लाऊज परिधान करायला खूप आवडतात. त्यामुळे ब्लाऊजवर तुम्ही खड्यांचे किंवा बारीक रंगीत मण्यांचे सुंदर वर्क करून घेऊ शकता. यामुळे तुमच्या ब्लाऊजचा लुक सुंदर दिसेल.
ब्लाऊजला थोडा हटके आणि स्टयलिश लुक द्याचा असेल तर तुम्ही या पॅटर्नचा ब्लाऊज शिवून घेऊ शकता. हा पॅटर्न शिवताना साडीचा काठ आणि साडीच्या आतील रंगाच्या कापडाचा वापर केला जातो.
हातांवर वर्क केलेले ब्लाऊज अतिशय सुंदर दिसतात. त्यामुळे हातांवर तुम्ही नथ, नाव किंवा इतर नक्षीकाम करून घेऊ शकता. यामुळे तुमच्या ब्लाऊजची शोभा वाढेल.