हत्येचा हंगाम! मूक-बधिर मुलीच्या जीवनावर आधारित हॉरर-सस्पेन्स चित्रपट, याचा शेवट उडवेल तुमचे होश
या चित्रपटाचे नाव कोलयुतीर काळम असे आहे. हा एक तमिळ भाषेतील चित्रपट आहे जो 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. कोलयुतीर काळम म्हणजे 'हत्येचा हंगाम'. नावावरूनच स्पष्ट होते की, हत्येशी संबंधित एक कथा असणार आहे
प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री नयनतारा या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चकरी टोलेटी यांनी केले आहे. हा एक हॉरर थ्रिलर चित्रपट आहे जो सस्पेन्सने भरलेला आहे.
हा चित्रपट 2016 मध्ये आलेल्या हॉलिवूड चित्रपट 'हुश'चा रिमेक आहे. चित्रपटाच्या कथेत एक मूकबधिर स्त्री तिच्या आयुष्यात अनेक आव्हानांना तोंड देताना दिसते
चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर हा चित्रपट श्रुती (नयनतारा) भोवती फिरतो. श्रुती ना ऐकू शकते ना बोलू शकते. मूकबधिर मुलीचे पालनपोषण अनाथाश्रमात झाले. तिच्या कलागुणांकडे बघता लंडनमधील एक करोडपती तिला दत्तक घेतो
हा करोडपती तिला आपला कायदेशीर वारसदार बनवतो. पण श्रुती लंडनमधील बंगल्यावर पोहोचताच कथा पूर्णपणे बदलते. अनेक विचित्र गोष्टी तिच्यासोबत घडू लागतात. हा चित्रपट OTT वर पाहता येईल.
बंगल्यात कोणीतरी तिचा पाठलाग करत असल्याचा भास श्रुतीला होऊ लागतो. यानंतर अनेक विचित्र गोष्टींशी तिचा सामना होतो. खरंतर कोणीतरी तिला मिळालेली मालमत्ता हडप करण्याच्या तयारीत असतो तो व्यक्ती कोण आहे हे आपल्याला चित्रपटाच्या शेवटी पाहायला मिळते