भारताचा संघ तिसऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी कटकवरून अहमदाबादला दाखल. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
टीम इंडियाची मागील सामन्यामध्ये धुव्वादार जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कहर केला आणि हिटमॅनने ३२ वे शतक ठोकले. तर शुभमन गिल अर्धशतक ठोकून भारतासाठी महत्वाच्या धावा केल्या. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू विराट कोहली पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे बाहेर होता पण दुसऱ्या सामन्यामध्ये देखील तो विशेष कामगिरी करू शकला नाही. तर भारताचा महत्वाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या सध्या चांगल्या लयीत आहे त्याला टीम इंडियाकडून त्याचबरोबर चाहत्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
रवींद्र जडेजाने त्याच्या फिरकीने आणि त्याच्या बॅटने चाहत्यांची मन जिंकली आहे, तर टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने त्याच्या वयाच्या ३३ व्या वर्षी एकदिवसीय संघामध्ये पदार्पण केले आहे त्याने त्याची जादू त्याच्या पहिल्या सामन्यातही दाखवली आहे. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
टीम इंडियाचा अष्टपैलू अक्षर पटेलने त्याच्या फिरकीची जादू मैदानावर तर दाखवलीची त्याचबरोबर त्याने त्याच्या बटने देखील कमाल केली आहे. पहिल्या सामन्यात त्याने अर्धशतक ठोकले आहे. टीम इंडियाचे ट्रम्प कार्ड श्रेयस अय्यरने पहिल्या एकदिवसीय सामन्यात रिप्लेसमेंट म्हणून संघामध्ये स्थान मिळवणारा श्रेयस अय्यरने पहिल्या सामन्यात जादू दाखवली होती, तर दुसऱ्या सामन्यात तो धावबाद झाला. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
यशस्वी जैस्वालला पहिल्या सामन्यात एकदिवसीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती, पण त्याला दुसऱ्या सामन्यात प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू ऋषभ पंत दोन्ही एकदिवसीय सामन्यामधून बाहेर होता, त्याला तिसऱ्या सामन्यामध्ये प्लेइंग ११ स्थान मिळणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या सामन्यात पदार्पण करणारा हर्षित राणाने पहिल्या सामन्यात कमाल करून दाखवली, तर अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी पुन्हा त्याच्यावर ट्रॅकवर येताना दिसत आहे, तर दुसऱ्या सामन्यामध्ये कुलदीप यादवला वगळण्यात आले होते. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया