Tech Tips: तुमचा स्मार्ट टिव्ही सतत हँग होतोय का? या सोप्या टीप्स करतील तुमची मदत
तुमचा स्मार्ट टिव्ही सतत हँग होत असेल तर तुम्ही काही सोप्या टीप्सचा वापर करू शकता.
टीव्ही रीस्टार्ट करा - काहीवेळा, टीव्ही बराच वेळ चालू ठेवल्याने त्याचा वेग कमी होऊ शकतो. अशावेळी टीव्ही बंद करा आणि मुख्य पॉवर स्विचवरून देखील तो डिस्कनेक्ट करा. 5-10 मिनिटांनंतर रीस्टार्ट करा.
सॉफ्टवेअर अपडेट करा - कालबाह्य सॉफ्टवेअरमुळे टीव्हीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. अशावेळी सेटिंग्ज वर जा आणि "सॉफ्टवेअर अपडेट" पर्याय शोधा. अपडेट अनेकदा बग आणि ग्लिचचे निराकरण करतात.
अनावश्यक ॲप्स आणि डेटा हटवा - स्मार्ट टीव्हीवर अधिक ॲप्स इंस्टॉल केल्याने, स्टोरेज आणि मेमरीवरील दबाव वाढतो. त्यामुळे न वापरलेले ॲप्स अनइंस्टॉल करा.
इंटरनेट कनेक्शन तपासा - स्लो इंटरनेटमुळेही टीव्ही हँग होऊ शकतो. तुमच्या इंटरनेट गतीची चाचणी घ्या आणि कनेक्शन स्थिर असल्याची खात्री करा.
फॅक्टरी रीसेट करा - वरील उपाय कार्य करत नसल्यास, फॅक्टरी रीसेट हा शेवटचा पर्याय असू शकतो. "सेटिंग्ज" वर जा आणि "फॅक्टरी रीसेट" किंवा "डिफॉल्टवर रीसेट करा" पर्याय निवडा. लक्षात घ्या की ही प्रक्रिया तुमचा सर्व डेटा आणि सेटिंग्ज डिलीट करेल, म्हणून प्रथम बॅकअप घ्या.