Tech Tips: फोन अनलॉक न करताही करू शकता कॉल, असं काम करतं स्मार्टफोनमधील इमरजेंसी फीचर
सर्व स्मार्टफोनमध्ये लॉक स्क्रिनवर एमरजेंसी कॉल नावाचे फीचर देण्यात आले आहे. जर एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून आणि शक्य तितक्या लवकर तुम्ही रुग्णवाहिका बोलवू शकता.
स्मार्टफोन कंपन्यांनी युजर्सच्या मदतीसाठी हे फीचर प्रत्येक स्मार्टफोनमध्ये दिलं आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स फोन लॉक असताना देखील कॉल करू शकणार आहेत. हे फीचर स्क्रीन लॉक असतानाही काम करते जेणेकरून पीडितेला मदत करता येईल.
अपघातावेळी लोकांना काय करावे, कोणाला कॉल करावा हे लगेच सूचत नाही. तसेच फोनचा पासवर्ड देखील अशा परिस्थितीत लगेच आठवत नाही. अशावेळी स्मार्टफोनमधील एमरजेंसी फीचर फायदेशीर ठरतं.
आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून मदत मागण्यासाठी फोनमधील Emergency SOS वैशिष्ट्य खूप उपयुक्त आहे.
तुम्ही फोनच्या लॉक स्क्रीनवर स्वाइप केल्यावर हे फीचर दिसते. अनेक फोनमध्ये ते Emergency SOS म्हणून दिसते आणि अनेकांमध्ये Emergency Call म्हणून दिसते.
काही इमर्जन्सी नंबर (जसे की 112) या फीचरमध्ये आधीच सेव्ह केलेले असतात, ज्यांना फक्त एका क्लिकने कॉल करता येतो.