Tejasswi prakash Karan Kundra: बिग बॉस 15 नंतर तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्या जोडीचे तुफान चाहते झाले. या दोघांचे गेल्या २ वर्षांपासून अफेअर असून गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये भांडण असल्याची आणि दोघानी ब्रेकअप केल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता तेजस्वीने करणसह फोटो पोस्ट करत पुन्हा एकदा या चर्चांना पूर्णविराम दिलाय. करण आणि तेजस्वी त्याच प्रेमाने एकमेकांसह सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. पाहा तेजस्वी आणि करणचा हा लुक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
तेजस्वीने अत्यंत मजेशीर कॅप्शन देत सोशल मीडियावर करणसह फोटो शेअर करत सर्वांची तोंडं बंद केली आहेत (फोटो सौजन्य - Instagram)
तेजस्वी आणि करण अत्यंत आनंदी दिसत असून सध्या सुट्टीचा आनंद घेत आहेत आणि तेजस्वीने प्रेमात असल्याची भावना किती सुंदर आहे स्वरूपाचे कॅप्शनही दिले आहे
तेजस्वीने ऑफशोल्डर अबोली रंगाचा ड्रेस घातला असून ती यामध्ये एखाद्या बाहुलीसारखी दिसत आहे
करणसह तेजस्वीने अत्यंत प्रेमात असल्याचे फोटो शेअर केलेत आणि दोघेही खूपच आनंदी असल्याचेही दिसत आहे
आपण तेजस्वीचे बेस्ट फोटो काढतो असं करणचं म्हणणं आहे तर प्रेम ही उत्तम भावना असल्याचे तेजस्वीचे म्हणणे आहे आणि यापैकी कॅप्शन तुम्हीच निवडा असंही ती म्हणाली आहे
तेजस्वीचा हा सनकिस्ड फोटो कमालीचा सुंदर आला असून तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय