'ती' दररोज कळवा खाडीत द्यायची जीव. (फोटो सौजन्य - Social Media)
मुंबई लोकलच्या मध्य रेल्वेवर असणारे कळवा स्थानक तर येथील पावसाळ्यात साठणाऱ्या पाण्यामुळे प्रसिद्धच आहे. पण अशी एक कथा आहे की ज्याने हे स्थानक भयावह वाटू लागते.
रात्री साडे अकराची कळव्याहून CSMT कडे सुटणारी ट्रेन ठाण्याकडे निघू लागताच, प्रवाशांना घामाच्या धारा सुटायच्या, कारण तेव्हा त्या लोकल ट्रेनमधील एक मुलगी एकदा नव्हे तर दररोज कळवा-ठाणे खाडीत उडी मारून जीव देत होती.
विचार करा, ज्या-ज्या व्यक्तींच्या डोळ्यादेखत हे दृश्य घडले असतील त्यांच्यावर काय परिणाम झाला असेल? ही बाब सरकारच्या ध्यानात आली.
अनेक प्रवाशांनी या घडत्या दृश्याबद्दल तक्रारी करण्यास सुरुवात केली. सरकारने या प्रकरणावर दखल घेत, त्या लोकलला कायमचे बंद करून टाकले.
लोकल बंद होताच दररोज घडणारे हे दृश्य बंदच झाले आणि लोकांनी सुखाचा श्वास घेतला.