फोटो सौजन्य - Sky Sports
द हंड्रेडमध्ये सदर्न ब्रेव्ह आणि वेल्स फायर यांच्यात झालेल्या सामन्यात विन्सने ही खास कामगिरी केली. विन्सने २६ चेंडूंचा सामना करत २९ धावा केल्या आणि फाफ डु प्लेसिसला मागे टाकले. फोटो सौजन्य - Sky Sports
टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत फाफ डू प्लेसिस यापूर्वी अव्वल स्थानावर होता. जुलैमध्ये मेजर लीग क्रिकेट दरम्यान त्याने विराट कोहलीला मागे टाकून हे स्थान मिळवले. फोटो सौजन्य - Sky Sports
विन्स आता ६६६३ धावांसह या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे आणि त्याच्याकडे डू प्लेसिससोबतचे अंतर आणखी वाढवण्याची उत्तम संधी आहे. जेम्स विन्सला टी२० क्रिकेट खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. तो द हंड्रेडमध्ये या हंगामात सदर्न ब्रेव्ह संघाचे नेतृत्व करत आहे. फोटो सौजन्य - Sky Sports
फोटो सौजन्य - Sky Sports
इंग्लंडचा खेळाडू जेम्स विन्सच्या टी-२० कारकिर्दीबद्दल बोललो तर तो जगभरातील वेगवेगळ्या टी-२० लीगमध्ये खेळताना दिसतो. विन्सने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत एकूण ४४९ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ४३७ डावांमध्ये फलंदाजी करताना ३२.११ च्या सरासरीने १२५५७ धावा केल्या आहेत. या काळात विन्सने ७ शतके आणि ८० अर्धशतके खेळली आहेत. फोटो सौजन्य - Sky Sports