जगातील सर्वात अनोखे रेल्वे स्टेशन, इथे ना Entry ना Exit तरीही थांबते ट्रेन; चला यामागचे कारण जाणून घेऊया
आता विचार करा एक असे रेल्वे स्टेशन जिथून कुणीही बाहेर जाऊ शकत नाही आणि कुणीही आत येऊ शकत नाही, तरीही इथे ट्रेन थांबते! हे रेल्वे स्टेशन वास्तविक अस्तित्वात असून ते जपानच्या दक्षिण भागात आहे आणि निशिकिगावा सेइर्यू लाईनवर बांधले गेले आहे
या रेल्वे स्टेशनवर बाहेर पडण्यासाठी गेट नाही तसेच इथे कोणताही प्रवेशद्वार नाही तरीही प्रवासी ट्रेनमधून उतरतात आणि थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर पुन्हा त्याच ट्रेनमध्येच चढतात
या अनोख्या रेल्वे स्थानकाचे नाव सेइर्यू-मिहाराशी स्टेशन आहे, या स्टेशनला एकच प्लॅटफाॅर्म आहे आणि ते सामान्य रेल्वे स्टेशन तर एक खास अनुभव देण्यासाठी त्याला बांधण्यात आले आहे
शिरयू-मिहाराशी रेल्वे स्टेशन विशेषत: निसर्गप्रमींसाठी डिजाईन केलेले आहे. येथे बस, ऑटो किंवा कनेक्टिव्हिटी नाही. हे फक्त एक असे ठिकाण आहे जिथे लोक ट्रेनमधून उतरुन काही काळ शांतता आणि साैंदर्य अनभवू शकतात
हे स्टेशन मुख्यत: नैसर्गिक साैंदर्याचा आनंद घेण्यासाठी बांधण्यात आले आहे. प्लॅटफॉर्मवरून निशिकी नदी आणि जवळच असलेल्या हिरवेगार जंगलांचे दृश्य खूप सुंदर दिसते. प्रवास करताना लोक या दृश्यांचा आनंद घेऊ शकतात