आयपीएलच्या एकाच सिझनमध्ये ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप जिंकणारे एकाच संघातील खेळाडू.
2013 मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपवर कब्जा केला होता. यामध्ये ऑरेंज कॅप मायकेल हसी याने जिंकली होती तर पर्पल कॅप डेव्हाॅन ब्रावो याने नावावर केली होती. फोटो सौजन्य : X
2017 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा डेव्हिड वॉर्नर याने ऑरेंज कॅप नावावर केली होती त्याचबरोबर भुवनेश्वर कुमार याने पर्पल कॅप जिंकली होती. फोटो सौजन्य : X
2022 मध्ये आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप ही जोस बटलर याने जिंकली होती तर पर्पल कॅप ही युजवेंद्र चहल याने नावावर केली होती. फोटो सौजन्य : X
2023 मध्ये गुजरात टायटन्सचा आत्ताचा कर्णधार शुभमन गिल याने ऑरेंज कॅपवर नाव कोरल होत तर पर्पल कॅप वर मोहम्मद शमी याने शिक्कामोर्तब केला होता.
आयपीएल 2025 च्या सीझनमध्ये गुजरात टायटन्सच्या फलंदाजाने आणि गोलंदाजांनी कॅपवर कब्जा केला. साई सुदर्शन याने ऑरेंज कॅप जिंकली तर प्रसिद्ध कृष्णा याने पर्पल कॅपवर नाव कोरले. फोटो सौजन्य : X