हे 5 पदार्थ मेंदूसाठी कोणत्या विषाहून कमी नाहीत; यांचे अतिसेवन शरीरासाठी ठरेल घातक
रिफाइंड शुगर किंवा जास्त साखरेचे सेवन केल्याने मेंदूमध्ये सूज वाढवतो. यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे समजून घेण्याची क्षमता नष्ट होते
बर्गर, समोसे, फ्रेंच फ्राईज यांसारख्या फास्ट फूडमध्ये असलेल्या ट्रान्स फॅट्समुळे मेंदूच्या पेशींना नुकसान पोहचते. असे म्हटले जाते की या पदार्थांमुळे मूड स्विंग्स म्हणजेच चिडचिडेपणा आणि नैराश्य वाढण्याची शक्यता असते
रिफाइंड पिठापासून बनवलेले ब्रेड, पिझ्झा, पास्ता यासारख्या गोष्टींमुळे शरीरात साखरेची पातळी अचानक वाढते. हे खाल्ल्याने मेंदूत सूज येते आणि लक्ष केंद्रित करण्यास त्रास होतो
कोल्ड्रिंक्स किंवा पॅकेज्ड ज्यूसमध्ये फ्रुक्टोज कॉर्न सिरपचे प्रमाण जास्त असते, जे मेंदूतील डोपामाइन संतुलन बिघडवते. त्यामुळे ताण, थकवा आणि चिडचिड सारख्या समस्या जाणवू लागतात
सॉसेज, सलामी आणि प्रोसेस फूडमध्ये मिसळलेली रसायने मेंदूची क्रिया मंदावतात. याशिवाय, यामुळे मानसिक थकवा, आळस आणि विचलितपणा देखील होतो