फॅशन जगाच्या इतिहासात 'या' अभिनेत्रींनी वाढवला भारताचा अभिमान
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या ग्लॅमर्स आणि फॅशन लुकमुळे कायमच चर्चेत असते. २०२५ च्या कान्स महोत्सवात ऐश्वर्या राय बच्चनने पांढऱ्या रंगाची साडी परिधान करत त्यावर लाल रंगाचे पोलके दागिने परिधान केले आहेत.
अभिनेत्री जान्हवी कपूरचा कान्समधील पहिला लूक साधा आणि सिंपल होता. यामध्ये तिने कोणत्याही पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण केले नव्हते. गुलाबी रंगाच्या ड्रेसवर मोत्याचे दागिने परिधान केले होते.
प्रियांका चोप्राने पोल्का-डॉट पोशाख असलेल्या बेस्पोक बालमेन पोशाख परिधान केला आहे. यावर तिने हिरव्या रंगाचा पोल्की नेकलेस परिधान करत आत्मविश्वास आणि क्लासिक शैलीचे सुंदर मिश्रण दाखवले आहे.
अभिनेत्री किनारी अडवाणीचा मेटा गाला २०२५ मधील लुक हा केवळ फॅशन स्टेटमेंट नाहीतर तिच्यासाठी सुंदर अनुभव होता. मेटा गालामध्ये तिने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. ज्यामध्ये तिचा सुंदर बेबी बम्प लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
आलिया भट्टने कान्समध्ये तिच्या आकर्षक साडी लुकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. तिने गुच्चीची स्टेटमेंट साडी परिधान करत भारतीय परंपरा जुन्या झालेल्या नाहीत, हे सिद्ध केले.