विदर्भातील 'हे' अस्सल पारंपरिक पदार्थ जगभरात आहेत प्रसिद्ध
भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते. त्यामुळे भातापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यात विदर्भात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे गोळा भात. बेसनाच्या पिठाचे गोळे तयार करून नंतर मसालेदार भात बनवून त्यात गोळे टाकले जाते.
महाराष्ट्रासह जगभरात सगळीकडे आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे पिठलं भाकरी. बेसनच आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालून बनवलेला पिठलं सगळ्यांचं खूप जास्त आवडते.
प्रत्येक घरात वांग्याची भाजी बनवली जाते. पण विदर्भात वांग्याचे मसालेदार भरीत बनवले जाते. नारळ, भरपूर मसाले, तीळ इत्यादी वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून बनवलेले भरीत चवीला सुंदर लागते.
विदर्भातील पारंपरिक आणि अतिशय फेमस असलेला पदार्थ म्हणजे सांबर वडी. विदर्भात कोथिंबिरीला सांबर बोलतात. बेसन, मैदा, भरपूर मसाले, दाण्याचे कुट वापरून बनवलेली वडी सगळ्यांचं खूप जास्त आवडते.
सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये धपाटे किंवा थालीपीठ बनवले जाते. वेगवेगळ्या पिठाचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.