मुकेश अंबानी यांच्या घरात ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत रोज शिजवले जातात हे पदार्थ, पहा मेन्यू कार्ड
अंबानींच्या घरी विविध राज्यांतील शेफद्वारे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. अँटिलियामध्ये विविध राज्यातील शेफ आहेत. कुटुंबातील सदस्यांना जे काही खाण्याची इच्छा ते सर्व पदार्थ त्यांच्या घरातील ताज्या अन्नपदार्थांपासून बनवले जातात.
साध्या भारतीय थाळीमध्ये डाळ, भाजी, पोळी आणि भात तर दिवसाच्या सुरुवातीला इडली, पोहे, उपमा किंवा डोसा अशा वेगवेगळ्या दक्षिण भारतीय आणि मराठमोळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. दुपारच्या जेवणात विविध प्रकारच्या डाळी, भाज्या, पोळी आणि दह्यापासून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी दोघेसुद्धा शाहाकारी आहेत. त्यांच्या घरातील पार्टी किंवा इतर कार्यक्रमातील जेवणात कायमच सगळ्यांसाठी शाहाकारी पदार्थ बनवले जातात.
संध्याकाळच्या नाश्त्यात चाट, ढोकळा किंवा फळे खाण्यास सार्वधिक पसंती दिली जाते. तसेच रात्रीच्या जेवणात अतिशय हलके आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन केले जाते.
अंबानी कुटुंबियांच्या जेवणात हंगामी भाज्या आणि संतुलित आहार घेतला जातो. उत्सवाच्या वेळी जैन परंपरेनुसार कांदा आणि लसूणचा वापर न करता सर्व पदार्थ बनवले जातात.