पैठणीशिवाय महाराष्ट्रात या हॅण्डलूम साड्या होतात तयार
महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून पैठणी साडीची ओळख आहे. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत भारतासह इतर देशांमध्ये मोठी मागणी आहे. हल्ली सर्वच महिला सण उत्सवाच्या दिवसांमध्ये पैठणी साडी नेसण्यास प्रथम प्राधान्य देतात.
सोलापूरमध्ये बनवली जाणारी प्रसिद्ध गंगा जमुना साडी अजूनही सगळीकडे लोकप्रिय आहे. या साडीची खासियत म्हणजे ही साडी दोन्ही बाजूने नेसता येते.
नारायण पेठ साडी प्रकार महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये तयार केला जातो. नारायण पेठ कॉटन आणि सिल्क अशा दोन्ही कापडांमध्ये बनवली जाते.
दक्षिण महाराष्ट्रातील खण हा प्रकार सगळीकडे खूप लोकप्रिय आहे. खणाच्या कापडापासून वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस, साडी बनवली जाते. खणामध्ये दोन रंगाचे कापड एकत्र करून साडी तयार केली जाते.
महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये हिमरू हा साडी प्रकार बनवला जातो. या साडीवर बारीक नक्षीकाम, नाजूक विणकाम ही या साडीची वैशिष्ट्य आहेत.हिमरू साडीच्या कापडापासून साडी, ओढणी, शाल, जॅकेट, बेडशीट, पडदे इत्यादी अनेक प्रकार बनवले जातात.