भारतातील 'या' साड्यांना मिळाला आहे GI टॅग
पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान आणि नादिया जिल्ह्यांमधील हाताने विणलेल्या टांगाईल साडीला जीआय टॅग देण्यात आला आहे. ही साडी हाताने विणकाम करून तयार केली जाते. तसेच या साडीवर हाताने विणकाम केलेली बटणे लावली जातात.
भारतात सण समारंभ किंवा शुभ कार्याच्या दिवसांमध्ये आवर्जून नेसली जाणारी बनारसी साडी जगभरात फेमस आहे. ही साडी वाराणसीमध्ये हाताने विणली जाते. बनारसी साड्या मुघल आणि भारतीय डिझाइनचे मिश्रण आहे. बनारसी साडी फक्त वाराणसीमध्ये तयार केली जाते.
गुजरातमधील पाटण येथील हाताने विणण्यात आलेली जगप्रसिद्ध साडी म्हणजे पटोला साडी. "इकत" विणकाम तंत्राचा वापर करून पटोला साडी बनवली जाते. ही साडी विणण्यासाठी रेशमी धाग्यांचा वापर केला जातो. पटोला विणण्याची प्रक्रिया खूप वेळखाऊ असते, ज्यामुळे साडी तयार करण्यासाठी अनेक महिने लागतात.
तामिळनाडूतील कांचीपुरम येथे बनवलेली कांजीवरम साडी सर्वच महिलांना खूप जास्त आवडते. चमकदार रेशीम आणि गुंतागुंतीच्या जरीकामासाठी कांजीवरम सिल्क साडी प्रसिद्ध आहेत. शाही विवाह सोहळ्यांमध्ये महिला कांजीवरम सिल्क साडी नेसण्यास जास्त प्राधान्य देतात.
झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालच्या आदिवासी भागात टस्सर सिल्क साडी बनवली जाते. तसेच या साडीला अहिंसक रेशीम असे सुद्धा म्हणतात. टस्सर सिल्क साडी तिच्या नैसर्गिक रंग आणि खडबडीत पोतसाठी ओळखली जाते.