सणवारांच्या दिवसांमध्ये सर्वच स्त्रिया आवर्जून साडी नेसतात. कितीही मॉर्डन कपडे आले तरी साडीची क्रेझ कधीच कमी होणार नाही. नव्या पद्धतीचे स्टायलिश फेस्टिव्ह कपडे खरेदी केल्यानंतर सुद्धा महिलांना साडी खरेदी करण्याचा मोह अजिबात आवडत नाही. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत भारतात मिळणाऱ्या हातमाग साड्यांना मोठी मागणी आहे. या साड्यांचे धागे वर्षनुवर्षं जसेच्या तसेच टिकून राहतात. चला तर पाहुयात मॉडर्न कपड्यांपेक्षा सोशल मीडियावर कोणत्या साड्यांना मोठी मागणी. (फोटो सौजन्य – pinterest)
मॉडर्न कपड्यांपेक्षा सोशल मीडियावर 'या' साड्यांची मोठी क्रेझ, पहा स्टायलिश साड्यांचे भन्नाट कलेक्शन

महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणी साडीने सगळ्यांचं भुरळ घातली आहे. हल्लीच्या तरुण पिढीला सुद्धा सणावारांच्या दिवसांमध्ये पैठणी साडी नेसायला खूप जास्त आवडते.

सोशल मीडियावर माहेश्वरी साडीचा मोठा ट्रेंड वाढला आहे. बारीक काठ आणि साडीच्या आतील नक्षीकामामुळे पुन्हा एकदा नव्याने साडीने मोठी मागणी वाढली आहे.

सणासुदीच्या दिवसांमध्ये काहींना खूप हेवी काठपदर साड्या नको असतात. अशावेळी इरकल साडीची निवड करू शकता. हातमागावर विणलेली इरकल साडी नेसल्यानंतर सुद्धा लुक देते.

अभिनेत्री जेनेलियाने नेसलेल्या खणाच्या साडीला सगळीकडे मोठी मागणी आहे. ही साडी कोणत्याही सण समारंभासाठी अतिशय उत्तम आहे.

दक्षिण भारतात फेमस असलेली कांजीवरम सिल्क साडी लग्न समारंभात आवर्जून नेसली जाते. या साडीचा हेवी आणि रिच लुक कार्यक्रमाची शोभा वाढवतो.






