आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतील 'हे' सुपरफूड, आंबवलेल्या पदार्थांनी करा दिवसाची सुरुवात
दुपारच्या जेवणात नियमित वाटीभर दह्याचे सेवन करावे. दह्यात सर्वोत्तम प्रोबायोटिक्स आणि लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया आढळून येतात. यामुळे पोटातील उष्णता कमी होते.
कांजी हा पारंपरिक पदार्थ आहे. गाजर आणि बीटचे पाणी तयार करून दोन ते तीन उन्हात आंबवण्यासाठी ठेवले जाते. हे पेय नियमित प्यायल्यास आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल.
दक्षिण भारतीय लोक प्रामुख्याने इडली, डोसा आणि आंबवलेल्या पदार्थांचे खूप जास्त सेवन करतात. या पदार्थांच्या सेवनामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात.
गुजराती नाश्त्यात पदार्थांमध्ये ढोकळा खातात. बेसन पिठापासून बनवलेला खमंग ढोकळा बनवला जातो. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही ढोकळा खाऊ शकता.
घरगुती मसाल्यांचा वापर करून बनवलेलं लोणचं चवीसोबत शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. जेवणाची चव वाढवण्यासाठी लोणचं खाल्लेले जाते.