बाल्कनी नेहमीच फुलांनी राहील भरलेली! वर्षाच्या बाराही महिने ताजेतवानी राहतात 'ही' फुलांची रोप
व्हायोला हे फुलांचे झाड हिवाळ्यात अतिशय खुलून दिसते. या रोपावर जांभळ्या रंगाची आकर्षक फुले येतात. थंड हवेच्या ठिकाणी व्हायोला फुले अधिक फुलतात.
हृदयाच्या आकाराची सायक्लेमेन फुले पाहिल्यानंतर मनावरील तणाव आणि थकवा कमी होतो. सिरेमिक किंवा टेराकोटाच्या भांड्यात तुम्ही सायक्लेमेन रोप लावू शकता.
पॅन्सीची फुले हृदयाच्या आकाराची असतात आणि विविध रंगांमध्ये फुलतात. ही फुले थंड हवामानात वाढतात. पॅन्सीची फुलांचा वापर करून तुम्ही तुमची बाल्कनी आणखीनच खुलवू शकता.
पेटुनिया हे अतिशय लोकप्रिय फुल आहे. हे फुल वाढण्यासाठी तेजस्वी सूर्यप्रकाश लागतो. याशिवाय जांभळी, गुलाबी, पांढरी आणि लाल अशा विविध रांगांमध्ये फुले येतात.
स्नॅपड्रॅगन ही फुले लहान मुलांना खूप जास्त आकर्षित करतात. बाल्कनीमध्ये लावल्यानंतर स्नॅपड्रॅगन फुलाचे झाड खूप जास्त उंच वाढते.