सध्याच्या लेटेस्ट आणि अपग्रेडेड स्मार्टफोनचा विचार केला तर त्यांचा कॅमेरा DSLR ला टक्कर देऊ लागला आहे. 200 मेगापिक्सेल पर्यंतचे कॅमेरा सेन्सर आता अनेक बजेट फोनमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे DSLR ने फोटोग्राफी करण्यापेक्षा लोकं आता फोनवरून फोटोग्राफी करू लागले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की काही छोट्या चुका तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा खराब करू शकतो? (फोटो सौजन्य – Pinterest)
तुमच्या या सवयी खराब करू शकतात तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा! आत्ताच सुधरा नाहीतर होईल मोठं नुकसान
खूप उष्ण किंवा खूप थंड भागात फोन कॅमेरा वापरणे टाळावे. जास्त तापमानात कॅमेरा जास्त गरम होऊ शकतो आणि खूप थंड हवामानात, फोनची बॅटरी आणि कॅमेरावर वाईट परिणाम होऊ शकतो .
नेव्हिगेशनसाठी स्मार्टफोनचा वापर करताना नकळत त्याच्या कॅमेऱ्यावर परिणाम होऊ शकतो. बाईकच्या कंपनामुळे कॅमेरा लेन्स आणि त्याच्या ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सिस्टमला थेट नुकसान होऊ शकते.
पाण्याखाली फोटोग्राफी करण्यासाठी फोन पाण्यात टाकणं, एक मोठा धोका आहे. फोनमध्ये पाणी शिरल्याने कॅमेरा सर्किट खराब होऊ शकतो.
प्रत्येक लेन्स गार्ड चांगला नसतो. बाजारात असे अनेक स्वस्त लेन्स प्रोटेक्टर उपलब्ध आहेत जे कॅमेऱ्याची प्रतिमा गुणवत्ता खराब करू शकतात.
जर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन कॅमेरा बराच काळ चांगला काम करायचा असेल तर या चुका टाळा. थोडीशी काळजी घेतल्यास तुमचा फोन खराब होण्यापासून वाचू शकतो.