काचेच्या तुकड्यांपासून बनवल्या जाणाऱ्या कुंदन दागिन्यांची 'ही' आहे खासियत
पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सगळीकडेच कुंदन दागिन्यांना विशेष महत्व आहे. लग्न सोहळ्यात किंवा घरातील इतर कोणत्याही कार्यक्रमात महिला सुंदर दागिने घालून छान तयार होतात. कुंदन दागिन्यांची मौल्यवान कला पिढ्यानपिढ्या चालत आली आहे.
कुंदन दागिने बनवण्यासाठी २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा वापर केला जातो. कुंदन हा भारतातील सगळ्यात जुना दागिना आहे. या दागिन्यांना २५०० वर्षांहून अधिक जुना इतिहास लाभला आहे. २४ कॅरेट सोनं मऊ करून नंतरच दागिने बनवले जातात.
कुंदन दागिन्यांची ओळख ११६ व्या शतकात झाली होती. ही सुंदर कला राजस्थान आणि गुजरातच्या राजपूत दरबारात करण्यात आली. पण काही काळानंतर मुघल आणि नंतर हैदराबादच्या निजामांसुद्धा कुंदन कला आवडू लागली. त्यामुळे कुंदन दागिन्यांवर अजूनही मुघल आणि राजपूत काळातील कला आणि कारागिरीचे चिन्हे आहेत.
कुंदन दागिने बनवताना खूप जास्त काळजी घ्यावी लागते. दागिने तयार करण्यासाठी सगळ्यात आधी सोन्याच्या पट्ट्या फोडल्या जातात आणि नंतर दागिन्यांना हवा तो आकार दिला जातो. या प्रकारातील दागिने बनवताना सोन्याचा अतिशय कमी वापर केला जातो. कारण यावर पन्ना, नीलमणी आणि माणिक यांसारखे विविध मौल्यवान रत्ने लावली जातात.
कुंदन दागिने बनवण्याचे काम अतिशय गुंतागुंतीचे आहे. बाजारात बनावट आणि भेसळयुक्त दागिने मोठ्या प्रमाणावर विकले जातात. त्यामुळे खरे दागिने ओळखण्यासाठी त्यावरील सील ओळखणे अतिशय महत्वाचे आहे.