यंदाच्या श्रावणात हातामध्ये भरा 'या' डिझाईनच्या रंगीत चमचमणाऱ्या बांगड्या
साडी नेसल्यानंतर हिरव्या किंवा रंगीत बांगड्यांमध्ये तुम्ही मेटलचे सुंदर कडे घालू शकता. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मेटल कडे उपलब्ध आहेत.
स्टोनवर्क केलेले गोठ केवळ मेटलच्या बांगड्यांमध्येच नाहीतर काचेच्या बांगड्यांमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. ज्या महिलांना भरपूर बांगड्या घालायला आवडत नाहीत, अशांसाठी काचेचे गोठ उत्तम पर्याय आहे.
हल्ली सोशल मीडियावर काचेच्या रेनड्रॉप बांगड्यांची मोठी क्रेझ आहे. या बांगड्या कोणत्याही ड्रेस किंवा साडीवर तुम्ही स्टाईल करू शकता. रेनड्रॉप बांगड्या हातांमध्ये घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात.
वेगवेगळ्या रंगाच्या रंगीत बांगड्याना रेनबो बांगड्या असे म्हणतात. इंद्रधनुष्याच्या रंगांच्या बांगड्या कोणत्याही रंगाच्या साडीवर, ड्रेसवर तुम्ही घालू शकता.
लग्नाच्या दिवशी नव्या नवरीच्या हातांमध्ये प्रामुख्याने हिरव्या बांगड्या असतात. तर पंजाब आणि इतर राज्यांमधील नवरीच्या हातात लाल रंगाचा स्टोन वर्क केलेला चुडा असतो.