यंदाच्या दिवाळीमध्ये पारंपरिक पद्धतीने नेसा साऊथ इंडियन हाफ साडी
साडी नेसण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा लग्न सराईत तुम्ही हाफ साडी नेसू शकता. सोशल मीडियावर हाफ साडी पॅर्टन ट्रेडींगला आहे.
हाफ साडी नेसताना साडी स्कर्टसारखी नेसवली जाते. त्यानंतर ओढणी किंवा दुसरी साडी घेऊन पुन्हा एकदा गुंडाळून साडीचा पदर काढला जातो. याशिवाय तुम्ही साडीला मॅच होईल अशा ओढणीचा सुद्धा वापर करू शकता.
पारंपरिक साडीपेक्षा हाफ साडी नेसणं अतिशय सोपं आहे. या साडीवर तुम्ही सोन्याचे दागिने, मोगऱ्याचा गजरा आणि सुंदर वेणी हेअर स्टाईल करू शकता. यंदाच्या दिवाळीमध्ये हाफ साडी नेसून नक्की पहा.
लग्नसराईच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच काहींना काही पारंपरिक लुक हवा असतो, अशावेळी हाफ साडी पॅर्टन अतिशय उठावदार आणि आकर्षक दिसेल.
हाफ साडी वजनाने अतिशय हलकी असते. त्यामुळे लहान मुलांसह कोणीही हाफ साडी सहज नेसू शकतं. याशिवाय बाजारात शिवलेल्या हाफ साडीसुद्धा उपलब्ध आहेत.