वॅक्स, रेझर की ट्रिमर... वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय
आपले सौंदर्य जपण्यासाठी लोक अनेक मेकअप प्रोडक्टसचा आपल्या त्वचेवर वापर करतात. मेकअप हा एकच पर्याय आपल्याला सुंदर बनवत नाही तर अनेक असेही घटक असतात जे आपले शरीर स्वछ ठेवण्यास आपली मदत करतात. आपल्या स्मूद त्वचेसाठी अनेकजण आपल्या हातांवरील, पायांवरील केस काढून टाकतात. यासाठी वॅक्सिंग, रेझर किंवा ट्रिमरचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का? अनेकजण आपला प्रायव्हेट पार्ट म्हणजेच वजाईना देखील स्वछ ठेवण्यासाठी त्यावरील केस काढून टाकतात. आता हा भाग जरा जास्ती संवेदनशील असल्याकारणाने यासाठी योग्य पर्यायाचा वापर करणे फार गरजेचे आहे.
वॅक्सिंगमुळे त्या भागाची स्वछता राखण्यास मदत होते आणि केसांची वाढ देखील मंदावते. अनेक महिला याचा वापर करतात पण यासाठी नक्की कोणता पर्याय सुरक्षित आणि सर्वोत्तम आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात घोंघावत असतो. चला तर मग आज या लेखात आपण वजाईनावरील केस काढून टाकण्यासाठी कोणत्या पर्यायाचा वापर योग्य ठरेल ते जाणून घेऊया.
रेझरचा वापर
अनेक महिला आंघोळ करताना त्याच्या काखेतील किंवा योनीवरील केस काढून टाकण्यासाठी रेझरचा वापर करतात, पण तुम्हाला माहिती आहे का? हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. रेझर वापरण्याची सर्वात मोठी भीती म्हणजे तुमची एक चूक तुमच्या त्वचेवर दुखापत करू शकते. यामुळे खाज सुटणे आणि संसर्ग या समस्यांचा धोका वाढतो. हेच कारण आहे की अधिकतर वेळी हा पर्याय महिलांनी टाळावा.
वॅक्सिंगचा वापर
तुम्ही कदाचित बिकिनी वॅक्सबद्दल ऐकले असेल. बहुतेक महिला ते घरीच करतात आणि त्यांचे प्रायव्हेट पार्ट देखील वॅक्स करतात. डॉक्टर म्हणतात की ही चांगली कल्पना नाही, कारण योनीवरील केस प्रोटेक्टिव लेयर म्हणून काम करतात आणि जेव्हा आपण त्यांना पूर्णपणे काढून टाकतो तेव्हा ते संरक्षणही निघून जाते. यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो.
ट्रिमरचा वापर
रेझर किंवा वॅक्सिंगपेक्षा ट्रिमिंग हा एक चांगला पर्याय मानला जातो. अनेक तज्ञ सहमत आहेत की प्रायव्हेट पार्टवरील केस नेहमीच ट्रिम केले पाहिजेत आणि ते पूर्णपणे शेव्ह न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ट्रिमिंगमुळे या भागात संरक्षणात्मक थर टिकून राहतो आणि संसर्गाचा धोका कमी होतो. शिवाय, या भागात कोणत्याही प्रकारचा साबण किंवा बॉडी वॉश वापरणे टाळा. वजाईना नेहमी स्वच्छ पाण्याने धुवा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.