लिव्हरवर वाढलेला चरबी एका झटक्यात होईल कमी! 'या' पद्धतीने करा टोमॅटोच्या ज्यूसचे सेवन
टोमॅटोमध्ये ग्लुटाथिओन नावाचा घटक असतो, ज्यामुळे शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते आणि शरीर स्वच्छ होते. लिव्हरचे काम सुरळीत चालू राहण्यासाठी टोमॅटोचा ज्यूस प्यावा.
जंक फूड, मद्यपान करणे, तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे लिव्हरमध्ये अनावश्यक चरबी जमा होऊन जाते. लिव्हरवर साचून राहिलेल्या चरबीमुळे गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.
टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. लिव्हरला आलेली सूज कमी करण्यासाठी टोमॅटोचा ज्यूस पिणे फायदेशीर ठरेल. यामुळे लिव्हरचे कार्य सुरळीत चालू राहते.
लिव्हरमधील एन्झाइम्स एक्टिव्ह ठेवण्यासाठी आणि शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. टोमॅटोच्या ज्यूसमध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी मदत करते.
टोमॅटोचा ज्यूस रिकाम्या पोटी पिऊ शकता. पण शरीरसंबंधित गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने टोमॅटोचा रस प्यावा.