Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Liver Damage: लिव्हरसबंधित आजाराच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, हलक्यात घेणे पडेल शरीरासाठी महागात

Liver Damage: लिव्हरच्या आजारांची लागण झाल्यानंतर हातांच्या तळव्यांवर लालसरपणा, खाज, नखे इत्यादी अवयवांमध्ये बदल दिसून येतात. या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 02, 2026 | 05:30 AM
लिव्हरसबंधित आजाराच्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, हलक्यात घेणे पडेल शरीरासाठी महागात

लिव्हरसबंधित आजाराच्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, हलक्यात घेणे पडेल शरीरासाठी महागात

Follow Us
Follow Us:

Liver Damage: लिव्हर शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव मानला जातो. रक्तातील प्रथिने, संप्रेरके आणि रक्ताभिसरण नियंत्रित ठेवण्याचे महत्वपूर्ण काम लिव्हर करतो. त्यामुळे लिव्हरच्या आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. जीवनशैलीत होणारे बदल, जंक फूडचे आणि शरीरसंबंधित इतर समस्या लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण करतात. लिव्हरचे आरोग्य बिघडल्यानंतर त्वचा, नखे आणि हातांच्या पेशींवर त्याचे स्पष्ट संकेत दिसू लागतात. त्यामुळे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे. सुरुवातीच्या टप्पयात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊन लिव्हर खराब झाल्यानंतर हातांवर दिसून येणारी लक्षणे.(फोटो सौजन्य – istock)

Health Care: थोडस पाणी प्यायल्यानंतर सुद्धा लगेच लघवीला जावे लागते? शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर किती पाणी प्यावे

हाताच्या तळव्यांवर लालसरपणा आणि खाज:

हातांच्या तळव्यांवर वारंवार खाज किंवा लालसरपणा जाणवत असेल तर ही सामान्य लक्षणे नसून लिव्हरच्या आजाराची लक्षणे आहेत. शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच राहून राहिल्यामुळे हातांवर लालसरपणा, खाज, पिवळेपणा जाणवू लागतो. तळव्यांमध्ये अशक्तपणा जाणवू लागल्यास फॅटी लिव्हर, हेपेटायटिस किंवा लिव्हर सिरॉसिस इत्यादी आजारांचे संकेत असू शकतात.

बोटे वाकणे किंवा आखडणे:

तुमची बोटे पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात आतल्या बाजूला वाकत असतील किंवा हाताच्या तळव्यांमध्ये ताठरपणा, कडकपणा जाणवत असेल तर दुर्लक्ष करू नये. क्रॉनिक लिव्हर डिसीज किंवा सिरॉसिसचा त्रास, अतिप्रमाणात मद्यपान केल्यामुळे ही लक्षणे दिसू लागतात. नखांचा रंग पूर्णपणे पांढरा होणे किंवा नखांच्या टोकांजवळ, मध्यभागी लाल किंवा गुलाबी रेष तयार झाल्यास रक्तभिसरणात अडथळे निर्माण होऊ शकतात. नखांमध्ये दिसून येणारे बदल लिव्हरच्या आजारांचा धोका दर्शवतात.

Pregnancy After Breast Cancer: ‘कर्करोगानंतरही आई होऊ शकेन का…’, प्रजनन क्षमता, गर्भधारणा आणि स्तनपान तज्ज्ञांचा योग्य सल्ला

नखांना सूज येणे:

लिव्हरच्या आजारांची लागण झाल्यानंतर नखांचे आरोग्य बिघडून जाते. नखांना सूज येणे, गोलाकार, रुंद आणि फुगीर नखे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लिव्हरच्या जुनाट आजारांची लागण झाल्यानंतर संबंधित लक्षणे दिसून येतात. लिव्हरचा आजार शेवटच्या टप्प्यात पोहचल्यानंतर मज्जासंस्थेवर हळूहळू परिणाम होतो. ज्यामुळे हात थरथरणे, कंप सुटणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लिव्हर खराब होण्याची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत?

    Ans: सतत थकवा जाणवणे, भूक मंदावणे, मळमळ, पोटाच्या उजव्या बाजूला दुखणे, त्वचेवर खाज येणे आणि लघवीचा रंग गडद होणे ही लिव्हरच्या समस्यांची काही संभाव्य सुरुवातीची लक्षणे आहेत.

  • Que: लिव्हर खराब झाल्यास त्वचेवर कोणते बदल दिसतात?

    Ans: त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा पडणे, त्वचेवर खाज येणे आणि सहज निळे डाग पडणे असे बदल दिसू शकतात.

  • Que: लिव्हरच्या आजारामुळे पोटावर सूज येऊ शकते का?

    Ans: होय. लिव्हरचे कार्य गंभीरपणे बिघडल्यास पोटात द्रव साचू शकतो. यामुळे पोट फुगणे किंवा सूज येणे अशी लक्षणे दिसतात.

Web Title: Liver damage do not ignore these symptoms of liver related diseases taking them lightly could prove costly for your health sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Liver
  • liver care

संबंधित बातम्या

रात्री झोपण्याआधी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरात दिसून येतील आश्चर्यकारक बदल, पचनक्रिया राहील निरोगी
1

रात्री झोपण्याआधी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरात दिसून येतील आश्चर्यकारक बदल, पचनक्रिया राहील निरोगी

Health Care: थोडस पाणी प्यायल्यानंतर सुद्धा लगेच लघवीला जावे लागते? शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर किती पाणी प्यावे
2

Health Care: थोडस पाणी प्यायल्यानंतर सुद्धा लगेच लघवीला जावे लागते? शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर किती पाणी प्यावे

Blood Donation Benefits: रक्तदान केल्यामुळे हृदयाच्या आरोग्याला फायदे होतात का? जाणून घ्या रक्तदानाचे फायदे
3

Blood Donation Benefits: रक्तदान केल्यामुळे हृदयाच्या आरोग्याला फायदे होतात का? जाणून घ्या रक्तदानाचे फायदे

Childhood Health: खेळण्याच्या वयात मुलांना थकवा का जाणवतो? मुलांच्या शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
4

Childhood Health: खेळण्याच्या वयात मुलांना थकवा का जाणवतो? मुलांच्या शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.