मंगळागौर- रक्षाबंधनला हवे आहेत पारंपरिक दागिने? मग मोत्याचे 'हे' दागिने साडीवर दिसतील शोभून
पारंपरिक दागिन्यांमधील सगळ्यात महत्वाचा दागिना म्हणजे चिंचपेटी. नऊवारी किंवा काठपदर साडी नेसल्यानंतर तुम्ही चिंचपेटी घालू शकता. यामुळे तुमचा गळा भरलेले वाटेल.
नऊवारी साडीवरील लुक पूर्ण करण्यासाठी नाकात नथ घातली जाते. तुम्ही मोती किंवा सोन्याची नथ खरेदी करू शकता. नथ घातल्यामुळे मराठमोळा लुक पूर्ण होतो.
हल्ली सर्वच महिलांच्या गळ्यात या डिझाईन्सचे सुंदर नेकलेस पाहायला मिळत आहेत. नाजूक साजूक मोती आणि रंगीत मण्यांचा वापर करून हा नेकलेस तयार केला जातो.
पैठणी किंवा नऊवारी साडी नेसल्यानंतर तुम्ही मोत्याचा तन्मणी घालू शकता. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच महिला सणावाराच्या दिवसांमध्ये मोत्याचा तन्मणी गळ्यात परिधान करतात.
नऊवारी साडीवरील लुक परिपूर्ण आणि सुंदर होण्यासाठी हातामध्ये तुम्ही मोत्याच्या बांगड्या घालू शकता. हिरव्या किंवा रंगीत बांगड्यांमध्ये मोत्याचे कडे सुंदर दिसतात.