गुढीवपाडव्याला पैठणी साडी नेसायची आहे? नक्की ट्राय करून पहा 'हे' ट्रेंडिंग रंग
आपल्यातील अनेक महिलांना अतिशय फिकट रंगाच्या साड्या नेसायला खूप आवडतात. त्यामुळे पैठणी साडीमधील हे रंग तुम्ही ट्राय करू शकता.
लाल रंग कोणत्याही त्वचेवर अतिशय खुलून दिसतो. लाल रंगाच्या साडीमध्ये तुम्ही हिरव्या किंवा इतर रंगाची काठ असलेली पैठणी साडी नेसू शकता.
गुलाबी, डार्क गुलाबी किंवा गुलाबी रंगाच्या वेगवेगळ्या छटा असलेली पैठणी साडी गुढीपाडव्याच्या लुकमध्ये सुंदर दिसेल. गुलाबी रंगाच्या पैठणी साडीवर तुम्ही मोत्याचे किंवा सोन्याचे दागिने घालू शकता.
रॉयल ब्लु किंवा निळा रंग अतिशय सुंदर दिसतो. सध्या बाजारात निळ्या रंगाच्या पैठणी साडीला खूप जास्त मागणी आहे.
हिरवा, गर्द हिरवा, पोपटी किंवा हिरव्या रंगातील सर्वच शेड्स तुम्ही सणावाराच्या दिवसांमध्ये नेसू शकता. पैठणी साडीमधील सगळ्यात उठावदार आणि डार्क रांगांमध्ये हिरवा रंग आहे.