कमकुवत केसांना मिळेल पोषण! रोजच्या आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या आवळ्याचे रोजच्या आहारात नियमित सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात आवळा पावडर मिक्स करून प्यायल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. याशिवाय केसांची मूळ मजबूत होतील.
मेथीमध्ये प्रथिने आणि निकोटिनिक ऍसिड मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होतो आणि केस गळणे थांबते. मेथी दाण्यांच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे नवीन केस उगवण्यास मदत होते.
सकाळच्या नाश्त्यात नियमित एक किंवा दोन अंडी खावीत. अंडी खाल्यामुळे शरीराला कॅल्शियम मिळते. याशिवाय अंड्यातील पिवळा भागात बायोटिन असते, जे केसांसाठी अतिशय प्रभावी ठरते.
मोरिंगमध्ये लोह, कॅल्शियम, झिंक, विटामिन ए, सी आणि ई इत्यादी अनेक घटक आढळून येतात. शरीरात निर्माण झालेल्या लोहाच्या कमतरतेमुळे वारंवार केस गळतात. त्यामुळे आहारात शेवग्याच्या शेंगांचे सेवन करावे.
बदाम, अक्रोड आणि जवस, काजू इत्यादी ड्रायफ्रूटचे सेवन करावे. या पदार्थांमध्ये विटामिन ई, झिंक आणि सेलेनियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे आहारात ड्रायफ्रूटचे सेवन करावे.